Talegaon Dabhade : इंद्रायणी बी. फार्मसी महाविद्यालयात पालक मेळावा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्था (Talegaon Dabhade) संचालित इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी. फार्मसी) महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 18) द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली.
Vanavadi News : वानवडी येथून सुमारे 12 लाखांचे अंमली पदार्थ जप्त, दोन आरोपींना अटक
या कार्यक्रमासाठी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजय आरोटे यांनी केले तर प्रा. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा आलेख पालकांसमोर मांडला. डॉ.संभाजी मलघे यांनी संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे हे सांगितले. पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा वेळोवेळी आढावा घ्यावा असे डॉ. संजय आरोटे यांनी सांगितले. कार्यक्रमाला पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे,कोषाध्यक्ष शैलेश शहा,विश्वस्त निरुपा कानिटकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुग्धा जोशी यांनी केले आणि पालक मेळाव्याचे महत्व सांगितले. आलेल्या सर्व (Talegaon Dabhade) पालकांचे स्वागत प्रा.श्रद्धा सातकर आणि प्रा. पूजा कुंभार यांनी केले. प्रा. विक्रांती कोळी यांनी आभार मानले.