Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात अश्वमेध वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) व इंद्रायणी इन्स्टिटयूटऑफ फार्मसी (डी.फार्मसी) महाविद्यालयात “अश्वमेध 2023” वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी (दि.29) संपन्न झाले, अशी माहिती बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे व डी. फार्मसी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ गुलाब शिंदे यांनी दिली.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विश्वस्त निरूपा कानिटकर व विलास काळोखे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम उत्साहात आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुलांचा उस्फुर्त उत्साह पाहता आम्हालाही आमच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली, असेही नमूद केले.

IPL 2023 : आयपीएलची ट्रॉफी यावर्षी तरी देशाच्या राजधानीत जाणार का?

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते.(Talegaon Dabhade) कार्यक्रमास विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी प्रा.कादंबरी घाटपांडे आणि प्रा. मृणाली काळे यांच्या सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शहा,  इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.(Talegaon Dabhade) कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश म्हस्के यांनी केले. सूत्रसंचालन अनुष्का डोंबे व युगंधरा कंगराळकर यांनी केले.तर आभार संकेत थोरात (जनरल सेक्रेटरी ) या विद्यार्थ्यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.