Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न! 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय व मावळ तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे (Talegaon Dabhade) आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, डी फार्मसीचे प्राचार्य जी.एस शिंदे,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अशोक जाधव,प्रा काशिनाथ अडसुळ,प्रा मिलींद खांदवे,प्रा आर आर डोके आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना चाटे म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही आपली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सुज्ञ लोकप्रतिनिधी आपण मतदानाच्या माध्यमातून निवडून देणे गरजेचे आहे. सुशासन आणि उत्तम प्रशासन यावर प्रत्येक भारतीय नागरीकाचा अधिकार आहे. याबाबतची जागरूकता मतदार दिनाच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून याद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे आवाहन नायब तहसीलदार चाटे यांनी केले.

उपप्राचार्य प्रा. ए. आर.जाधव भाषणात म्हणाले की, आपली समृद्ध लोकशाही ही राजकीय पक्ष व मतदार यावर टिकून आहे. देशातील प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्क बजावून चांगले लोकप्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. त्यामुळे महासत्येचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

Chinchwad Bye Election : उमेदवारी जगताप कुटुंबातच; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत

इंद्रायणी महाविद्यालयाने सन 2022मध्ये मतदार नोंदणी वाढविण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाची विशेष दखल घेऊन जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या हस्ते महाविद्यालयाला प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच राज्यशास्त्र विभागाचे प्रा.मिलींद खांदवे यांनी नव मतदार जागृतीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकशाहीतील अविभाज्य भाग असलेल्या निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांनी सकारात्मकतेने पहावे आणि त्यात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकटीकरणासाठी अधिक प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. तसेच प्रा.आर. आर. डोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार अर्थशास्त्र विभागाचे प्रा.के.व्ही. अडसुळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.