Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालय वाणिज्य शाखेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन 

एमपीसी न्युज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या वतीने पर्यावरणासंबंधी दोन महत्वांच्या विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. (Talegaon Dabhade) मुलांमध्ये शाश्वत संसाधने वापरासंबंधी जागृती निर्माण करण्याच्या हेतूने ‘बेस्ट ऑफ वेस्ट’ आणि ‘गो ग्रीन ब्रिथ क्लीन’ पोस्टर्स मेकींग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, वाणिज्य विभाग प्रमुख रूपकमल भोसले व प्राध्यापक उपस्थित होते.

‘बेस्ट ऑफ वेस्ट’ स्पर्धेत नेहा विजय वाघमारे, प्रियंका बगले,आकाश भालेकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर सायली देसाई हिने द्वितीय आणि माधवी तुमकर हिने तृतीय क्रमांक मिळविला तसेच केतकी आणि किशोरी चव्हाण,मुस्कान खान व हमीद पठाण या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला आहे.

Pimpri News : रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करा, बीट निरीक्षकांच्या धर्तीवर सेफ्टी निरीक्षक नेमा

‘ गो ग्रीन ब्रिथ क्लीन ‘ या स्पर्धेत मुस्कान खान आणि हमीद पठाण यांनी प्रथम,निकीता शेवकर हिने द्वितीय तर अंकिता कलवडे या विद्यार्थ्यीनीने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे व प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विज्ञान विभागप्रमुख प्रा रोहित नागलगाव आणि अर्थ शास्त्र विभागाच्या (Talegaon Dabhade) प्रा डाॅ अर्चना जाधव यांनी  परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वाणिज्य विभागातील प्रा. राधा गोहाड यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.