Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालक-शिक्षक युती आवश्यक- प्रदीप कदम

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा विकास करून यशस्वी होत असताना सर्वांगीण विकास साधावा. सगळ्या माध्यमातून पुढे जाताना पालकांनी विद्यार्थ्यांना वेळ दिला तरच संस्कार होऊ शकतात. असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम यांनी व्यक्त केले.
इंद्रायणी विद्या मंदिरच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पालक सभेच्या निमित्ताने वाणिज्य आणि कला या विभागातील पालकांच्या सभेच्या निमित्ताने ‘प्रबोधन पालकांसाठी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी कदम बोलत होते.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के मलघे, उपप्राचार्य ए आर जाधव, प्राध्यापक संदीप भोसले, प्राध्यापक आर आर डोके, प्राध्यापिका गायकवाड, प्राध्यापक चौधरी मॅडम, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन उपाय योजना कराव्यात ते महत्वाचे आहे. त्यासाठी शिक्षक व पालक युती महत्त्वाचीच आहे, असे प्रा.प्रदीप कदम म्हणाले.

यावेळी प्राचार्य डॉ मलघे, उपप्राचार्य जाधव त्याचबरोबर पालक प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक संदीप भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय आणि प्राध्यापक चौधरी मॅडम यांनी निवेदन केले. प्रा. विना भेगडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.