BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलचे खो- खो, कबड्डी स्पर्धेत यश

171
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये श्री बाळासाहेब बाबुराव शेळके एज्युकेशन सोसायटीच्या इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी खो- खो, व कबड्डी स्पर्धेत यश संपादन केले. तळेगाव दाभाडे येथील एम्पोस इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

14 वर्षे वयोगटाखालील मुलींच्या संघाने व 12 वर्षे वयोगटाखालील मुलांच्या संघाने खो खो मध्ये प्रथम क्रमांक पटकविला. मुलींच्या गटामध्ये कु. कुरमी सुधा रामकेवल उत्कृष्ट खेळाडू ठरली तर मुलांच्या गटात हुसेन हसन ताहीर उत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याचप्रमाणे 12 वर्षे वयोगटाखालील मुलांच्या संघाने कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. या गटामध्ये कु सिंग शुभम निरज उत्कृष्ट खेळाडू ठरला.

विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेळके व संस्थेचे पदाधिकारी, स्कूलच्या मुख्याध्यापिका रंजिता थंपी, उपमुख्याध्यापिका रंजना जोशी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक विशाल मोरे सर व मिटन शिल यांचे मार्गदर्शन लाभले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.