Talegaon Dabhade : इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शुभम सिंहची उंचउडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शुभम निरज सिंहची उंचउडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

भोसरी- या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजीत विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा रविवार दि-१० नोव्हेंबर २०१९ संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी या ठिकाणी झाल्या. या स्पर्धेमध्ये उंच उडी या क्रीडा प्रकारात कु. शुभम निरज सिंह हा १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.

श्रीमंत शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभमची निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेळके, मुख्याध्यापिका रंजीता थंम्पी यांनी कौतुक व अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल मोरे व मितन शील यांचे मार्गर्शन मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1