Talegaon Dabhade : यश प्राप्त करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी आवश्यक – ललित पवार

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी असुन या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित पवार यांनी केले.

डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आंबी येथे प्रथम वर्षीच्या नवागतांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्याच्या स्वागत सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पवार, उपप्राचार्य डॉ.प्रकाश पाटील, विभागप्रमुख विठ्ठल वाघ, सर्व विभागप्रमुख डॉ. शैलेश चन्नापट्टना, डॉ. मिनिनाथ निघोट, डॉ.अनुपकुमार बोंगाळे, संजय बढे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थी व त्यांचे पालक यासाठी दरवर्षी शिबिर आयोजित केले जाते. यांत विविध क्षेत्रातील रोजगार संधी, संशोधनाचे महत्व, पेटंट, व्यवस्थापकीय कौशल्य, तंत्रज्ञानाची भासणारी उणीव कशी भरुन काढतां येईल याविषयी मार्गदर्शन केले जाते.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. अभय पवार म्हणाले की, सृजनशील व समाजोपयोगी संशोधन देशाच्या विकासात महत्वपूर्ण आहे. विठ्ठल वाघ यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा प्रथम वर्षासाठी असणारा अभ्यासक्रम व परीक्षेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.प्रकाश पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

डी वाय पाटील टेक्निकल कॅपसचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील व संचालक डॉ. रमेश वस्सपनवर, व्यवस्थापक भवानराव गायकवाड, निबंधक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. सूत्रसंचालन मिलिंद करंजकर व पूजा देसाई यांनी केले तर सागर बालगुडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.