Talegaon Dabhade : महिलांनी सादर केलेल्या ‘कजरा महोब्बत वाला’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- जागतिक महिला दिनानिमित्त तळेगांव दाभाडे नगरपरिषद व महिला व बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांनी महिलांसाठी सादर केलेल्या ‘कजरा महोब्बत वाला’ या जुन्या नव्या हिंदी- मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हा कार्यक्रम कलापिनी संस्थेच्या सभागृहात सादर करण्यात आला. महिलांना संसारातून थोडा विरंगुळा मिळावा असे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. यावेळी तळेगावामधील कष्टकरी व होतकरू महिलांचा आदर्श महिला म्हणून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारिका संजय भेगडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे उपस्थित होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, महिला व बालकल्याण समिती सभापती प्राची आशुतोष हेंद्रे, सर्व समिती.सदस्य सर्व विद्यमान आणि आजी माजी नगरसेविका तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.