Talegaon Dabhade : शिवाजी महाराजांचे चरित्र हे देशाला दिशा देणारे – आयुक्त आर. के. पद्मनाभन

एमपीसी न्यूज- छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे देशाला दिशा देणारे व योग्य दिशा बदलू न देणारे आहे. त्यांच्या आयुष्यातील विविध अडथळ्यांवर त्यांनी केलेली मात ही प्रेरणादायी आहे, असे मत पिंपरी चिंचवासचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केले. छत्रपती शिवशंभू स्मारक समिती व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, मावळ यांच्या संयुक्त सहकार्याने जाणता राजा महानाट्याच्या ‘देणगी प्रवेशिका अनावरण सोहळा’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, वडगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या अध्यक्षा सारिका नाईकनवरे, प्रशांत ढोरे, संतोष भेगडे (पाटील) व सुनील शेळके उपस्थित होते.

पद्मनाभन पुढे म्हणले की, शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, रणनीती, युद्धशास्त्र, प्रशासन यांची आठवण तरूण पिढीला करून दिली पाहिजे. तळेगावातील होणारे शिल्प हे समाजाला सतत प्रेरणा देत राहील. आयुष्यातील काम करण्याची फार मोठी संधी छत्रपती शिवरायांच्या प्रारंभिक कर्मभूमी असणाऱ्या मावळ भागात मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले,” शिवरायांचा इतिहास हा नवीन पिढीला चांगल्या कार्यासाठी चेतना व कार्यसिद्धीला प्रेरक आहे. महानाट्याच्या रूपाने हे साध्य होणारे आहे. छत्रपतींचा इतिहास जागवून नवीन पिढी या महानाट्याच्या आधारे संस्कारीत करण्याची संधी मिळालेली आहे. शिवरायांचा इतिहास हा नेहमीच जीवनात प्रेरकच राहणार आहे. जगभरातील 108 देशात महाराजांच्या युद्धनीती शिकवीली जाते. भूदल व नाविक दलामध्ये शिवरायांच्या आरमाराची माहिती शिकवीली जाते याचा अर्थ शिवचरित्र हे नवीन पिढीला चेतना देणारे आहे. संभाजी राजांनी अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात 84 लढाई जिंकल्या होत्या. तळेगावात होणारे शिवशंभू तीर्थ हे समाजाला व तरूणांना मार्गदर्शन व उदात्त कार्याला आदर्शवत आहे. या चांगल्या सत्कर्मी कार्यात समाजाने हिरारीने भाग घेऊन इतिहास हा जिवंत ठेवण्यास हे महानाट्य व तीर्थ नक्कीच भविष्यात मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो”

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र आपल्या भागातील अन्य प्रांतिकांना जाणता राजा महानाट्याच्या रूपाने समजावे याकरिता एक लाख रूपये किमतीच्या देणगी प्रवेशिका विकत घेवून लोकप्रतिनीधिंसमोर वेगळा आदर्श निर्माण केला

प्रास्ताविक शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील यांनी केले. स्वागताध्यक्ष आमदार संजय भेगडे यांनी जाणता राजा महानाट्याची भूमिका विशद केली. देवराई संस्थेचे गिरीश खेर यांनी जाणता राजा महानाट्याद्वारे निधिसंकलनाचे स्वरूप स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रा. दीपक बिचे व सुरेश दाभाडे यांनी केले. आभारप्रदर्शन सुनील शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चिराग खांडगे, युवराज काकडे, संजय बावीसकर, श्रीकांत मेढी, विनीत भेगडे, विनायक भेगडे, अवधुत पोंक्षे, विनय सोरटे, प्रसाद कुऱ्हे, अभिमन्यू शिंदे, गणेश कवितके, अजित शेलार, प्रतीक भेगडे, निलेश भेगडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता सुचेता बिचे यांच्या पसायदानाने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.