BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी अध्यक्षपदी जयश्री टिळे यांची निवड

116
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी जयश्री टिळे यांची निवड करण्यात आली. रविवारी ( दि. 10) जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

यामध्ये जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी अध्यक्षपदी जयश्री टिळे, उपाध्यक्षपदी वंदना कोळी, राजश्री गोदेगावे यांची तर सुप्रिया पारखे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.

पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तळेगावच्या माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे होत्या. यावेळी अण्णाराव कोळी, ऍड देवीदास टिळे, संदीप गोंदेगावे, सुरज कुरडे, विराज कोळी, दै.पुढारीचे पत्रकार जगन्नाथ काळे, अशोक मेहता, गगन जैन, मनोहर पालन, योगेंद्र डोळस, डॉ. संजय पवार, जयानंद केनी उपस्थित होते.

सुलोचनाताई आवारे म्हणाल्या, ” महिला सुशिक्षित असो अथवा अशिक्षित असो त्यांनी धाडसाने उभे राहून समाजसेवा केली पाहिजे. त्यासाठी महिलांना मदत करायला मी तयार आहे” नवनिर्वाचित अध्यक्ष जयश्री टिळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन हिरामण बोत्रे यांनी केले तर सुप्रिया पारखे यांनी आभार मानले.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3