Talegaon Dabhade : जितेंद्र खळदे यांची मावळ तालुका युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील पक्षाचे कार्यकर्ते जितेंद्र तानाजी खळदे यांची मावळ तालुका युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे युवकचे तालुकाध्यक्ष विलास मालपोटे यांनी खळदे यांना नियुक्तीचे तसे पत्र दिले आहे.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे,अंजलीराजे दाभाडे,तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, यादवेंद्र खळदे, कार्याध्यक्ष अॅड. खंडुजी तिकोणे,तालुका सरचिटणीस विजयराव काशीद पाटील, संभाजी लेंडघर, सुधीर भोंगाडे, सचिन काशीद आदी उपस्थित होते.

जितेंद्र खळदे हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात.त्यांनी यापूर्वी तालुका युवकचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.