Talegaon Dabhade : ज्योती भेगडे- दुर्गे यांना नारीरत्न पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- शेलारवाडी गावातील तसेच पैसाफंड प्राथमिक शाळेतील शिक्षिका ज्योती भेगडे-दुर्गे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मदत सामाजिक संस्थेच्या वतीने अलीकडेच नागपूर येथे 17 वे सामाजिक कार्यकर्ता शिबिर पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सोनक, सचिव दिनेश वाघमारे यांच्या हस्ते ज्योती भेगडे-दुर्गे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्योती भेगडे यांच्या शैक्षणिक, तंत्रस्नेही समुह, साहित्य , सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुणे जिल्ह्यातून निवड होणाऱ्या त्या एकमेव स्त्री शिक्षिका आहेत.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डोळसनाथ पंतसंस्थेचे सचिव सतीश भेगडे, नू. म. वि. प्र. मंडळाचे सचिव संतोष खांडगे ,पैसाफंड शाळेचे अध्यक्ष विनायक अंभ्यकर, महेशभाई शहा, मुख्याध्यापिका अनिता लादे, अर्चना काटे, सुरेश शिंदे ,आशा लबडे, गणेश बोरुडे, दिलीप डोळस यांनी विशेष अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.