Talegaon Dabhade : ज्योती भेगडे- दुर्गे यांना समाज वैभव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे जवळील शेलारवाडी गावातील तसेच पैसाफंड शाळेतील शिक्षिका ज्योती भेगडे- दुर्गे यांना समाज वैभव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय पत्रकार संघ यांच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे संपन्न झाला. या सोहळ्यात एबीपी माझाचे न्यूज अँकर प्रसन्न जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, अभिनेत्री शिल्पी अवस्थी, प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणीजनांचा राष्ट्रीय स्तरावरील सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ज्योती भेगडे यांना हा पुरस्कार त्यांना सामाजिक ,शैक्षणिक, तंत्रस्नेही समुह क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे.

या सन्मानाबद्दल नू. म. वि. प्र. संस्थेचे सचिव संतोष खांडगे, डोळसनाथ पतसंस्थेचे सचिव सतीश भेगडे, पैसाफंडचे अध्यक्ष विनायक अंभ्यकर, जिल्हामंत्री संदेश भेगडे, मुख्याध्यापिका अनिता लादे, अर्चना काटे, आशा लबडे, सुरेश शिंदे, गणेश बोरुडे, दिलीप डोळस, प्रमोद देशक, वैष्णवी भालेकर यांनी विशेष अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.