Talegaon Dabhade : ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाला तळेगावकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कलापिनी बाल-कुमारभवनचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम दिमाखदार सादरीकरणांनी आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये उत्साहात पार पडला. कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कलापिनीचे विश्वस्त डाॅ. अनंत परांजपे आणि सचिव हेमंत झेंडे आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात अजय शिंदे यांनी ढोलकीवर वाजवलेल्या तोड्यानं आणि विराज सवाई आणि सहका-यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतानं दणक्यात झाली. अविनाश शिंदे, संदीप मानकर आणि सहका-यांनी ‘जोगवा’ सादर करून यावर कळस तर चढवलाच पण प्रक्षकांकडून वन्स मोअर ही मिळवला.

कार्यक्रमाच्या शेवटी यशवंतनगर बालभवन मुले आणि पालकसंघाने कचरा आणि पाण्याच्या समस्येवर प्रकाश टाकणारं ‘तुफान आलंया’ हे नृत्य सादर केलं. तसंच कथक नृत्यांगना अनघा कुलकर्णी आणि शिष्यांनी सादर केलेल्या ‘मी मराठी’ या रचनेने ‘महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी निलेश दवणी या कलाकाराने बाहुल्या आणि टाकाऊ वस्तुंपासून तयार केलेलं बारा महिन्यांतील बारा सणांचं प्रदर्शन ही आकर्षणाचा बिंदू ठरलं.

कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन, संयोजन आणि प्रास्ताविक कलापिनीच्या उपाध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांनी केलं तर अनघा बुरसे, केतकी लिमये यांनी मोलाचं सहकार्य केलं.

माधुरी-विजय कुलकर्णी यांच्या उस्फूर्त निवेदनाने कार्यक्रमाची शोभा वाढली. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनीसंयोजन केलं. विनायक काळे, प्रतिक मेहता यांनी प्रकाशयोजना केली. आदित्य धामणकर, विशाखा बेके, रश्मी पांढरे, दीपक जयवंत, गीता सम्पथ आणि कार्यकर्त्यांनी बॅकस्टेजची जबाबदारी सांभाळली. डाॅ. परांजपे यांनी मार्गदर्शन केलं. हेमंत झेंडे यांनी आभार मानले. प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.