Talegaon Dabhade : कलापिनीचा मूकनाट्य महोत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज- कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे नुकताच ‘मूकनाट्य महोत्सव’ साजरा झाला. कै. रजनी धोपावकर स्मृती पुष्प उपक्रमांतर्गत या मूकनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात ‘शतपावली’ हे पुणे,मुंबई येथील संघांच्या झालेल्या मानाच्या ‘मौनांतर’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेले आणि रंगवर्धन चळवळ गाजविलेले ‘रोबोला जेव्हा जाग येते’ ही मूकनाट्ये सादर झाली. दोन्ही मूकनाट्यांमधील कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने रसिकांची माने जिंकली.

शतपावली या मूक नाट्यात उदरनिर्वाहासाठी देहविक्री करणाऱ्या मातेची अगतिकता आणि तिच्या चिमुकलीच्या भावविश्वाचे निरागसपण याचे उत्तम सादरीकरण होते तर रोबोला जेव्हा जाग येते यात आपल्या बहिणीसाठी चोरी करणारा चोर आणि त्याला ते करण्यापासून परावृत्त करणारा रोबो अशी कथा मांडली होती

उत्तम,अभिनय उत्कट सादरीकरण यामुळे रसिक भारावून गेले. शतवली या मूकनाट्यास कथालेखन प्रथम पुरस्कार – खगेश जोशी सर्वोत्कृष्ट अभिनय- मुक्ता भावसार, सांघिक प्रथम पुरस्कार मिळाले. याचे दिग्दर्शन चेतन पंडित यांनी केले होते तर रोबोला जेव्हा जाग येते याची संकल्पना डॉ.अनंत परांजपे यांची होती, दिग्दर्शन मनोज काटदरे याचे होते व त्यात मनोज काटदरे, विपुल परदेशी आणि अविनाश शिंदे यांनी भूमिका केल्या होत्या. दोन्ही मूकनाट्यास डॉ.अनंत परांजपे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.

महोत्सवाचे प्रमुख अतिथी नागेश धोपकार म्हणाले, “या उपक्रमामुळे नवीन कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ कलापिनीच्या माध्यमातून मिळाले असून यामुळे उत्तम कलाकार तयार होण्यास चांगली मदत होईल” कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय लिमये म्हणाले की, शतपावली या मूकनाट्यामधून कलाकारांची सामाजिक प्रश्नांबाबत असलेली संवेदना जागृत असल्याचे जाणवले.

.महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रतीक मेहता, विनायक काळे, शार्दुल गद्रे, वादिराज लिमये, हृतिक पाटील, विराज सवाई, प्रणव केसकर, चैतन्य जोशी, आदित्य धामणकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.