Talegaon Dabhade : कामधेनु दत्तक योजनेअंतर्गत जनावरांसाठी उपचार शिबिर

एमपीसी न्यूज- टाकवे – वडेश्वर मतदारसंघात टाकवे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फ़त कामधेनु दत्तक योजनेअंतर्गत जनावरांचे उपचार, गोचीड व जंत निर्मूलन उपचार, वैरण बियाणे, कॅल्शियम याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व कृषि कमिटीचे सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभाताई कदम, टाकवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुप्रीयाताई मालपोटे, उपसरपंच रोहिदास आसवले, मावळ तालुका राष्ट्रवादी संघटन मंत्री नारायण ठाकर, प्रसिद्ध बैलगाडा मालक नंदुभाऊ असवले, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुदाम कदम, माजी सरपंच बाबाजी गायकवाड, उद्योजक अनिल मालपोटे, अविनाश असवले,गणेश ढोरे, सुहास वायकर, गोरख मालपोटे, अनिल जाधव, भरत आसवले,डॉ पल्लवी कोरे डॉ.परंडवाल व पशुमालक मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.