Talegaon Dabhade: कांतीलाल शाह विद्यालयाचा दहावीचा निकाल सलग नवव्या वर्षी 100 टक्के

Talegaon Dabhade: Kantilal Shah Vidyalaya's 10th result is 100 percent for the ninth year in a row या शाळेतील पंकज संदीप गाडे, मानसी बापूसाहेब पवार, रोशनी अ सय्यद या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

एमपीसी न्यूज- यंदाच्या राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत कांतीलाल शाह विद्यालयाने सलग नवव्या वर्षी आपली 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या शाळेतील पंकज संदीप गाडे, मानसी बापूसाहेब पवार, रोशनी अ सय्यद या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

या वर्षी पंकज गाडे याने 92.40 टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर मानसी पवारने 91.60 टक्के गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांकाचे स्थान मिळविले. रोशनी सय्यद हिने 89.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. 28 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह आणि 35 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेत यावर्षीही 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिका-यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन रावत व सर्व शिक्षकवृंदांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.