Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे शनिवारी खानदेश खाद्यमहोत्सव

खानदेशी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची तळेगावकर खवय्यांना संधी

एमपीसी न्यूज- तीन यशस्वी खाद्य महोत्सवानंतर आता तळेगाव येथील योगीराज हॉलच्या वतीने खास खानदेशी खाद्यपदार्थांचा खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 12) संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत हा खाद्य महोत्सव होणार असून या महोत्सवात तळेगावकर खवय्या मंडळींना एकापेक्षा एक चविष्ठ खानदेशी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेमध्ये खानदेशी खाद्यपदार्थांना खवय्या मंडळींकडून विशेष मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन यंदा योगीराज हॉलच्या वतीने खास खानदेश खाद्यमहोत्सव भरवण्यात आला आहे. या महोत्सवात भरीत भाकरी, शेव भाजी, डाळ बट्टी, फडफडीत भात, डाळफळ, मठ्ठा, आमसूल सार अशा खमंग, झणझणीत खानदेशी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. त्याशिवाय केळीचे वेफर्स, पापड बिबडे, मेहरूणची बोरं, जळगावची केळी यांची देखील चव चाखता येणार आहे.

या महोत्सवासाठी प्रवेशिका असून आज, गुरुवारपासून शुक्रवार (दि. 11) पर्यंत योगीराज हॉल, डी पी रॉड, राव कॉलनी येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तळेगावकरांनी याचा लाभ घेऊन खानदेशी पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like