Talegaon Dabhade : कलापिनीच्या खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज- कलापिनी संस्थेतर्फे आयोजित कै ना वा खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा मावळ तालुका पातळीवर उत्साहात संपन्न झाल्या, हे या स्पर्धेचे 35 वे वर्ष होते.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण राष्ट्रीय पातळीवरील कलाशिक्षक सन्मान प्राप्त मिलिंद शेलार यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मावळ प्रेस कौन्सिलचे उपाध्यक्ष गणेश बोरुडे, शिक्षणतज्ञ् डॉ आनंद वाडदेकर आदी उपस्थित होते. बालवाडी ते खुला गट या विभागात आलेल्या स्पर्धेत ८५० बाल चित्रकलाकार सहभागी झाले होते.

5 वी ते 10 वी विभागात अंतिम फेरीसाठी निवडलेल्या बाल कलाकारांसाठी कार्यशाळा चित्रकार ऋतिक कुंभार, कोमल डावखरे व विराज सवाई यांनी घेतली. कोमल डावखरे यांनी वारली चित्रपद्धतीचे मार्गदर्शन केले व पुण्याचे युवक चित्रकार ऋतिक कुंभार यांनी चित्रकार शेखर वैरागी यांचे पोर्ट्रेट काढून ‘पोर्ट्रेट’ चे प्रात्यक्षिक दाखवून प्रभावित केले. विराज सवाई यांनी विवेचन केले. ऋतिक कुंभार, कोमल डावखरे व किरण खानखोजे यांनी परीक्षण केले.

डॉ अनंत परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. अंजली सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. स्पर्धेचे संयोजन स्पर्धाप्रमुख अशोक बकरे, विशाखा बेके, आरती पोलावार, पल्लवी पांढरे, सायली रौंधल, जितेंद्र पटेल व बालभवन प्रशिक्षिकांनी यशस्वीरित्या केले.

पारितोषिक विजेते:

जूनियर सीनियर केजी
प्रथम क्रमांक… अभिष्री पास्ते.. एम्प्रोस इंटरनेशनाल स्कूल
द्वितीय क्रमांक.. गौरी पोला वार… इंद्रायणी इंग्लिश स्कूल
तृतीय क्रमांक.. आयुर परदेशी… जैन इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ बक्षिसे… रुद्र भागवत.. मामासाहेब खांडगे स्कूल
सोहम वाडदेकर… माउंट सेंट ऍन

पहिली दुसरी गट….
प्रथम क्रमांक.. अंकित सामंथा.. हचीग्ज इंग्लिश स्कूल.
द्वितीय क्रमांक.. ज्योती जांगिड… इंद्रायणी इंग्लिश स्कूल
तृतीय क्रमांक… अद्वैत नारखेडे.. पोदार इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ बक्षिसे…. वेदिका इंगळे… एम्प्रोस इंटरनेशनाल स्कूल
शर्विल गायकवाड… हचीग्ज इंग्लिश स्कूल
ओम शेडे… जैन इंग्लिश स्कूल
समृद्धी काळोखे.. जैन इंग्लिश स्कूल
कनक हुंडेकरी.. जैन इंग्लिश स्कूल

तिसरी चौथी गट
प्रथम क्रमांक.. अनुराग खोल्लम.. पैसा फंड शाळा
द्वितीय क्रमांक: जानवी दांडगे आणि अथर्व बोंबले… पैसा फंड शाळा
तृतीय क्रमांक.. वैष्णवी गवली.. जैन इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ बक्षिसे…
भार्गवी कर्वे.. आदर्श विद्या मंदिर
राजू पटेल… आदर्श विद्या मंदिर
वंश घाडगे.. पैसा फंड शाळा
स्नेहल चौगुले… जैन इंग्लिश स्कूल
राम मुखिया.. चैतन्य इंटरनॅशनल स्कूल
पवन महाडिक.. पैसा फंड शाळा
अनुष्का नरुटे… पैसा फंड शाळा

पाचवी ते सातवी गट
प्रथम क्रमांक.. समृद्धी राऊत.. चैतन्य इंटरनॅशनल स्कूल
द्वितीय क्रमांक.. पार्थ टाकसाळे.. माउंट सेंट ऍन
तृतीय क्रमांक.. सुहानी पाटील… हचीग्ज स्कूल
उत्तेजनार्थ बक्षिसे..
साहिल कुलकर्णी.. माउंट सेंट ऍन
मृणाल चाचे… माउंट सेंट ॲन
आद्या जोशी… एम्प्रोस इंटरनेशनाल स्कूल
सृष्टी हेंद्रे.. माउंट सेंट ऍन

आठवी ते दहावी गट
प्रथम क्रमांक.. गीतिका सुतार…. सरस्वती विद्या मंदिर
द्वितीय क्रमांक.. सार्थकी सराफ दार.. माउंट सेंट ऍन
तृतीय क्रमांक.. जानवी पाटील… सरस्वती विद्या मंदिर
उत्तेजनार्थ बक्षिसे
रिद्धी पाटील… सरस्वती विद्या मंदिर
विजय काळाने.. आदर्श विद्या मंदिर
विराज वाळूज.. माउंट सेंट ऍन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.