Talegaon Dabhade : किसन आबाजी दाभाडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसन आबाजी दाभाडे (वय 58) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांचे पश्चात दोन मुले, मुलगी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

युवा उद्योजक निखील दाभाडे व स्वप्निल दाभाडे यांचे ते वडील तर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य व डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य सुदाम दाभाडे आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब दाभाडे यांचे ते बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.