Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे शाळेचा निकाल 100 टक्के

कृष्णराव भेगडे शाळेच्या विद्यार्थ्यांची याहीवर्षी गुणवत्तेत सरशी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थांनी सलग तिसऱ्या वर्षी घवघवीत यश संपादन केले. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शाळेचा निकाल १०० % लागला असून सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

शाळेची विद्यार्थिनी मयूर दिलीप पाटील हिने ९२.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर आदित्य कैलास पवार हा विद्यार्थी ९१.८०% गुण मिळवून दुसरा आला. धनंजय संजय बोरसे याने ९१ % गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.

या सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे व विषय शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ.दिलीप भोगे व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.