-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon Dabhade: जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी लाखाची मदत

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्त

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी लाखाची मदत केली. याबाबतचा एक लाख रुपयांचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृतज्ञता सहायता निधीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांचेकडे पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुपुर्त केला.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी होता. पण, स्वतः पवार यांनी कार्यकर्ते आणि जनतेला आवाहन केले होते की, माझा वाढदिवस साजरा न करता जे शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करतात, त्यांच्या घरातील मागील कुटुंबासाठी काही स्वरुपात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत करता यावी, या उद्देशाने कृतज्ञता सहायता निधी गोळा करा आणि त्या शेतकरी बांधवांना मदत करा. याच उद्देशाने पवार यांच्या वाढदिवसनिमीत्ताने पुणे जिल्हा परिषद सदस्या शोभा सुदाम कदम यांनी एक लाख रुपयांचा धनादेश कृतज्ञता सहायता निधीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांचेकडे सुपुर्त केला.

याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष आर्चना घारे ,पुणे जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम ,पिंपरी चिंचवड युवती आध्यक्ष वर्षा जगताप, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष शैलजा काळोखे, पंचायत समितीच्या माजी सदस्या ललिता कोतुळकर, आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णा घोलप, निगडे गावच्या सरपंच सविता भांगरे आदी उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.