Talegaon Dabhade : कोरोनाच्या लढ्यासाठी भाऊसाहेब सरदेसाई रूग्णालयाला लाखाचे वैद्यकीय साहित्य भेट

एमपीसी न्यूज : लोणावळा येथील कल्पतरू हाॅस्पिटल व सामाजिक कार्यकर्ते जयंतीलाल ह. ओसवाल, डाॅ. निकेश ज. ओसवाल, डाॅ. अभय कामत, चेतन गगट यांच्या वतीने कोरोनाच्या लढ्यासाठी तळेगाव दाभाडे येथील भाऊसाहेब सरदेसाई रूग्णालयाला (जनरल हाॅस्पिटल) सुमारे एक लाख रूपये किंमतीची औषधे, सॅनिटायजर, मास्क व हॅण्ड ग्लोज देण्यात आले.

तळेगाव येथील श्री विठ्ठल रूख्मिणी सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेला 50 हजार रूपयांची मदत करण्यात आली. या प्रसंगी तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंझाड, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे, उद्योजक संतोष शेळके अनिल पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.