Talegaon dabhade : स्व.नथुभाऊ भेगडे कोविड सेंटरला शिवरत्नकडून आर्थिक मदत

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व मायमर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित स्व. नथुभाऊ भेगडे पाटील कोविड सेंटर साठी माळवाडी येथील शिवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेकडून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

या कोविड सेंटरमध्ये निशुल्क सेवा दिली जात आहे.

पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास शेलार व विद्यमान उपाध्यक्ष सूर्यकांत ओसवाल यांनी धनादेश यतीनभाई शहा (रा.स्व.संघ जिल्हा व्यवस्था प्रमुख),व जनकल्याण समितीचे कार्यवाह उदय कुलकर्णी यांचेकडे सुपूर्त केला.

याप्रसंगी रा.स्व.संघाचे हेमंत दाभाडे यांनी मार्गदर्शन करुन कोरोना सेंटरच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी पतसंस्थेचे संचालक रमण पवार व संभाजी शेलार तसेच जनकल्याण जिल्हा सहकार्यवाह दीपक आंबीकर व रा.स्व.संघाचे जिल्हा सेवा प्रमुख अभिजित शिंदे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.