Talegaon Dabhade News: शिक्षकदिनी डॉ रघुनाथ माशेलकर यांचे झुमवर व्याख्यान

दरवर्षी मावळ तालुक्यात सर्व शिक्षण संस्था 5 सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असतात.

एमपीसी न्यूज- शिक्षक दिनानिमित्त दि. 5 सप्टेंबर (शनिवार)  रोजी  जागतिक शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्या मंदिर संस्था, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, स्नेहवर्धक मंडळ, प्रतिभा इन्स्टिट्यूट व तळेगावमधील सर्व शैक्षणिक संस्थांना शनिवारी सकाळी 10 वाजता झुमवर हे व्याख्यान ऐकता येणार आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त आणि प्रकल्प प्रमुख शैलेश शाह व सहप्रकल्प प्रमुख, प्रसिद्ध उद्योजक राजेश म्हस्के यांनी याचे आयोजन केले आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे,त्रिदल पुण्याचे संस्थापक डॉ. सतीश देसाई, लायन्स जिल्हा माजी प्रांतपाल राजेंद्र मुछाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी मावळ तालुक्यात सर्व शिक्षण संस्था 5 सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. त्याचबरोबर ज्ञानदानाचे कार्य करणा-या गुरूजन शिक्षकांचा, प्राध्यापकांचा सन्मान करत असतात. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गामुळे शाळा कॉलेज बंद आहेत. त्यामुळे शिक्षकदिन साजरा केला जाणार नाही.

सर्व शाळा, कॉलेज, प्राथमिक विभागापासून महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. शिक्षक मंडळी हे ज्ञानाचे कार्य समर्थपणे करत आहेत. जसे विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहे. तसे हे भविष्य घडविण्याचे कार्य शिक्षक करीत आहेत. तेव्हा या सर्व शिक्षक मंडळीसाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन शिक्षक दिन साजरा करावा, असे आवाहन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले आहे.

झुम- ID 88020740773
Password- 207958

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.