Talegaon-Dabhade : वीजपुरवठा खंडित केला म्हणून महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण

एमपीसी न्यूज : वीजपुरवठा खंडित केल्याने कार्यालयात घुसून महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला तरुणाने बेदम मारहाण केली.(Talegaon-Dabhade) ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी तळेगाव दाभाडे येथे घडली.

विक्रम गुलाब राठोड (वय 39, रा. ताथवडे) असे मारहाण झालेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार उर्फ विकी नवघने (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या तळेगाव-दाभाडे स्टेशन शाखा – 1 येथे फिर्यादी विक्रम राठोड हे सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. महिन्याभरापूर्वी आरोपीला वीजबिल चुकीचे आले होते. त्याला वीजबिल दुरुस्त करून दिले होते. त्यावेळी त्याने महावितरणच्या कार्यालयात येऊन शिवीगाळ केली होती. दरम्यान फिर्यादी यांनी आरोपीला वीजबिल भरण्याबाबत सांगितले होते. मात्र त्याने वीजबिल भरले नव्हते.(Talegaon-Dabhade) त्यामुळे महावितरण कडून आरोपीचे वीज कनेक्शन कट केले.

Mahesh Landge : भूसंपादनाचे प्रस्ताव महिन्याभरात मंजूर करा – महेश लांडगे

त्या रागातून आरोपीने सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयात येऊन सहाय्यक अभियंता राठोड यांना मारहाण केली.(Talegaon-Dabhade) तू एफआयआर तर कर, मी नंतर येऊन तुला ठेचतो, अशी धमकी देखील आरोपीने दिली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.