Talegaon Dabhade : ऑर्ड्नन्स डेपो वर्कर्स यूनियनच्या जेसीएम पदी महेश शिंदे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ऑर्ड्नन्स डेपो वर्कर्स यूनियनच्या जेसीएम पदी महेश उर्फ राजू विलास शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी यूनियनचे अध्यक्ष श्री शंकरदादा भेगडे तसेच जे सी एम श्री बी एम शेख, उपाध्यक्ष श्री अरुण तापकीर, श्री यशवंत दाभाडे , श्री दिलीप जगताप, जनरल सेक्रेटरी श्री मयूर भेगडे, श्री आशीष दाभाडे, राजेंद्र शिंदे , मनोज दाभाडे , विजय कुंभार , राहुल कांबळे, धनशेखर साहेब, सुहास वाठारकर, छबुराव दिवसे, राहुल टिळेकर, सागर साळुंके, संदीप सांगवान हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी शिंदे यांनी वर्क्स कमेटी मेंबर व मेडिकल सेक्रेटरी पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. म्हणूनच त्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेतच त्यांची यापदावर सर्वांच्या पाठींब्याने सन्माननीय निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.