Talegaon Dabhade : नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीत ‘महिला राज’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सातपैकी पाच समित्यांवर महिलांना संधी मिळाल्याने नगरपरिषदेत ‘महिला राज’ अनुभवायला मिळणार आहे. 

भाजपकडे स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम, नियोजन आणि विकास, महिला व बालकल्याण या चार समितीचे सभापतीपद आले आहे तर जनसेवा विकास समितीला शिक्षण समिती, आरोग्य समिती, पाणीपुरवठा समिती या तीन समितीचे सभापतीपदे मिळाली आहेत.

तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या अध्यक्षतेखालीखाली विषय समित्या सदस्य व सभापतीपदाच्या निवडीसाठी नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे आदी उपस्थित होते.

  • स्थायी समिती: सभापती नगराध्यक्षा चित्रा संदीप जगनाडे (पदसिद्ध अध्यक्ष) :
    सदस्य- मंगल सुरेश जाधव, गणेश वसंतराव खांडगे, सुलोचना गंगाराम आवारे, संग्राम बाळासाहेब काकडे, शोभा अरुण भेगडे, काजल प्रदीप गटे, अरुण जगन्नाथ भेगडे, किशोर छबुराव भेगडे, गणेश मोहन काकडे

सार्वजनिक बांधकाम समिती: सभापती – मंगल सुरेश जाधव.
सदस्य- नीता अशोक काळोखे, कल्पना सुरेश भोपळे, रोहित महादू लांघे, अनिताअनिल पवार, संतोष छबुराव भेगडे, वैशाली प्रमोद दाभाडे.

  • शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती : सभापती -गणेश वसंतराव खांडगे.
    सदस्य-निखील उल्हास भगत, सुशील उर्फ विजय ज्ञानेश्वर सैंदाणे, संतोष आनंदा शिंदे ,सुरेश यशवंतराव दाभाडे, संगीता राजेंद्र शेळके ,मंगल नंदकुमार भेगडे

स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती:सभापती – सुलोचना गंगाराम आवारे.
सदस्य-रवींद्र गंगाराम आवारे ,सुरेश यशवंतराव दाभाडे ,संतोष आनंदा शिंदे ,अमोल जगन्नाथ शेटे, अरुण बबन माने, संतोष छबुराव भेगडे .

  • पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती :
    सभापती – उपनगराध्यक्ष संग्राम बाळासाहेब काकडे (पदसिद्ध सभापती)
    सदस्य- रवींद्र गंगाराम आवारे, संध्या गणेश भेगडे ,प्राची आशुतोष दळवी,विभावरी रवींद्र दाभाडे, वैशाली प्रमोद दाभाडे, किशोर छबुराव भेगडे.

नियोजन आणि विकास समिती: सभापती – शोभा अरुण भेगडे
सदस्य- नीता अशोक काळोखे, अमोल जगन्नाथ शेटे, हेमलता चंद्रभान खळदे, निखिल उल्हास भगत, बापूसाहेब जयवंतराव भेगडे, अरुण बबन माने

  • महिला व बालकल्याण समिती: सभापती – काजल प्रदीप गटे
    उपसभापती – कल्पना सुरेश भोपळे,
    सदस्य- संध्या गणेश भेगडे, हेमलता चंद्रभान खळदे, अनिता अनिल पवार, मंगल नंदकुमार भेगडे, संगीता राजेंद्र शेळके.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.