Talegaon Dabhade : मैत्रस्पर्श सोशल फाउंडेशनने स्वीकारले 15 गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील मैत्रस्पर्श सोशल फाउंडेशनच्या वतीने पु. वा. परांजपे शाळेतील 15 गरीब विद्यार्थ्यांचे सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. या मुलांच्या शैक्षणिक शुल्क भरण्यासाठीचा धनादेश फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक संतोष भेगडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक येणारे सर यांचेकडे सुपूर्द केला.

यावेळी कार्यक्रमासाठी माजी शिक्षिका सावित्रिताई भेगडे, मुळे सर, वंजारे सर, मैत्रस्पर्श सोशल फाउंडेशनचे ओंकार वर्तले, गजानन घबाडे, शंकर वाजे, संतोष वसंत भेगडे, मुकुंद बागुल, सुधीर बारमुख, संदीप माने, दत्ता तनपुरे, सचिन घारे आदी मान्यवर व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बॊलताना माजी आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले, ” शिक्षण घेताना मुलांना आर्थिक अडचणी येत असतात. या आर्थिक अडचणी भागवण्यासाठी व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थी यांनी पुढे येणे गरजेचे आहे. ही गरज मैत्रस्पर्श सोशल फाउंडेशनने ओळखून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे”

संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक संतोष भेगडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक शाळेचे शिक्षक भगवान शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन फाउंडेशनच्या सचिव ऋचा जॊगळेकर- खाड्ये यांनी केले. तर आभार कोयते मॅडम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.