Talegaon Dabhade : कलापिनी परिवारचे ज्येष्ठ सदस्य मालकर गुरुजी यांचे निधन

एमपीसी न्यूज- कलापिनी परिवारातील ज्येष्ठ आजीव सदस्य आणि कलाकार प्रल्हाद मालकर उर्फ मालकर गुरुजी (वय 86) यांचे शनिवारी (दि.25) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा संजय, मकरंद, कन्या ऐश्वर्या आणि सुना व नातवंड असा परिवार आहे.

मालकर गुरुजी आणि मालकर मामा या नावाने प्रसिद्ध होते. हसतमुख विनोदी स्वभाव यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूपच मोठा होता. कलापिनीच्या स्थापनेपूर्वी असलेल्या हौशी नाट्य मंडळात कार्यरत होते त्यांनी हौशी नाट्य मंडळाच्या “अंमलदार” या नाटकात भूमिका केली होती. एड्सला गाडा या पथनाट्याच्या पुणे जिल्ह्यात झालेल्या दौऱ्याचे ते व्यवस्थापक होते तसेच कलापिनीच्या कटक (ओरिसा) दौऱ्याचे प्रमुख होते. मालकर गुरुजी जनसंघ आणि भाजपाचे निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने तळेगावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

दशक्रिया विधी सोमवारी ( दि.3) रोजी सकाळी नऊ वाजता बनेश्वर तळेगाव दाभाडे येथे होणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.