Talegaon Dabhade : खांडगे स्कूलमध्ये ‘संविधान दिवस’उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘संविधान दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध स्पर्धा करण्यात आले.

देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. विद्यार्थ्यांना संविधान दिवसाची माहिती देऊन रसिका विशिष्ट यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञेचा अर्थ स्पष्ट
करून सांगितला.

या दिना निमित्त शाळेत पुढील सहा महिन्यात राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. या मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या
जीवनावर आधारित नाट्यछटा सादरीकरण, पोस्टर बनवणे, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, भारतीय घटनेच्या प्रस्तावना वाचन असे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका श्रीनिवासन यांनी मार्गदर्शन केले तर शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.