Talegaon Dabhade : मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज – सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर ( Talegaon Dabhade) केला. त्यामध्ये तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा 100 टक्के निकाल लागला. शाळेने सलग सहा वर्षांपासून 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली गुरव यांनी दिली.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलच्या 10 वी (सन2023-24 ) सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सलग सहाव्या वर्षीही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.या परीक्षेला ३३ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला आहे.

Cyber Crime : सावधान! पोलीस, एनसीबी, सीबीआय, आरबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवून  ब्लॅकमेल केले जात असेल तर…

कु. सार्थक दत्तात्रय भांडवलकर याने  (94.00 %) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. यश भीमराव साळवी याने (93.00%) गुण मिळवून द्वितीय क्रमांकाचे स्थान मिळविले, कु. प्रियल सचिन जिंदाल हिने (91.00 %)गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला, कु. शिवराज सुयोग जगदाळे याने ( 83.00 %) गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला. कु.यश महेश म्हाळसकर याने  ( 82.00% ) गुण मिळवून पाचवा  क्रमांक पटकावला.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,उपाध्यक्ष व शाळेचे अध्यक्ष गणेश खांडगे,संस्थेचे सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार आदींनी  मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन ( Talegaon Dabhade) करून कौतुक केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.