Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी पदाचा पदभार ममता राठोड यांनी स्वीकारला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या (Talegaon Dabhade ) उपमुख्याधिकारी या रिक्त पदाचा पदभार उपमुख्याधिकारी म्हणून ममता बाबुराव राठोड यांनी स्वीकारला. त्यांना मुख्याधिकारी एन. के.पाटील यांनी रुजू करून घेतले.

तत्पूर्वी तळेगाव दाभाडे येथे उपमुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सुप्रीया शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषदेत बदली झाली. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील उपमुख्याधिकारी हे पद रिक्त झाले होते. या पदावर उपमुख्याधिकारी म्हणून ममता बाबुराव राठोड यांनी (दि.25) रोजी पदभार स्वीकारला.

Sharad Pawar : संसदेच्या नव्या वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमावर ‘त्या’ मुळे टाकला बहिष्कार – शरद पवार

राठोड या यवतमाळ नगर परिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी बीई इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांची कर निर्धारण व प्रशासकीय सेवा श्रेणी ‘अ’ या सवर्गातून या पदावर निवड (Talegaon Dabhade ) झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.