_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade : पाले पठार येथील विहिरीचे हभप मंगल महाराज जगताप यांचे हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज –  येथील मावळ विचार मंच संचलित मावळ पठार सुविधा समितीने निधी संकलन कार्यक्रमाच्या माध्यमातून संकलित केलेल्या निधीद्वारे पाले पठार (ता.मावळ) येथे खोदलेल्या विहिरीचे लोकार्पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून हभप मंगल महाराज जगताप यांचे हस्ते करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

पठार समितीचे अध्यक्ष कल्पेश भोंडवे यांनी स्वागत केले. या प्रकल्पाची संकल्पना विषद केली. मावळ विचार मंचाचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.रविंद आचार्य यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी संस्थेच्या सर्व कार्याची माहिती दिली.

  • मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी, आपल्या मनोगतात प्रत्येक सार्वजनिक कार्य करतांना प्रत्येकवेळी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने सामाजिक कार्याला हातभार लावला तर कोणत्याही कामाला अडचण निर्माण होत नाही, असे मत व्यक्त केले तसेच अशीच सेवाकार्ये मावळ विचार मंचाच्या माध्यमातून भविष्यात देखील जोमाने सुरू राहतील, अशी ग्वाही दिली.
_MPC_DIR_MPU_II

हभप मंगल महाराज जगताप यांनी संस्थेच्या या कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेच्या भविष्यातील पठार सुविधा कार्यात स्वतः देखील वाटा उचलणार असल्याचे सांगितले.

  • कार्यक्रमप्रसंगी मा.सभापती एकनाथराव टिळे, ज्ञानेश्वर दळवी, राजाराम शिंदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव टाकवे, मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रविंद्र भेगडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी वडगांवचे नगरसेवक ऍड.विजयराव जाधव, गटनेते दिनेश ढोरे ,देहूरोडचे नगरसेवक रघुवीर शेलार, रविंद्र म्हाळसकर, किरण भिलारे, प्रसाद पिंगळे, मोरेश्वर पोफळे, नारायण ढोरे, ऍड.तुकाराम काटे ,सोमनाथ काळे, विठ्ठलराव भोईर, विनायक भेगडे , पवन भंडारी, राजू कुलकर्णी, विठ्ठलराव घारे,विजयराव टाकवे, योगेश म्हाळसकर, संदीप म्हाळसकर, अतुल म्हाळसकर, रविंद्र आंद्रे, एकनाथ पोटफोडे, सरपंच संदीप वाघुले, नितीन चव्हाण,  अंकेश ढोरे, संतोष पिंपळे, धनाजी कोकरे,  दत्तात्रय आखाडे, श्लोक पिंगळे, तसेच पठारावरील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • या कामामुळे अनेक नागरिकांची व पशुधनाची पिण्याच्या पाण्याची गैरसोय संपुष्टात येणार असून भर उन्हाळ्यात देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध राहील. सूत्रसंचालन भूषण मुथा आणि अतुल राऊत यांनी केले. आभार प्रदर्शन अनंता कुडे यांनी केले.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.