Talegaon Dabhade : मनकर्णिका महिला संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

एमपीसी न्यूज – मनकर्णिका महिला संघातर्फे शिवजयंतीनिमित्त महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच दुचाकीवरून करंडेवस्ती ते मारूती मंदिरपर्यंत रॅली काढत शिवरायांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. 

मनकर्णिका महिला संघातर्फे साठ ते सत्तर महिलांनी दुचाकीला भगवा ध्वज बांधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच पाळणा व आरती गायली गेली. दरम्यान ऐश्वर्या करंडे हिने शिव गर्जना केली तर शौर्यवी वशिष्ठ हिने गीत सादर केले.

यावेळी संघाच्या संस्थापिका वीणा करंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले “शिवजयंती सणाप्रमाणे घरोघरी साजरी होऊन शिव संस्कार मना मनात रुजले पाहिजेत. तसेच स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांनीच सक्षम होणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या “.

यावेळी वैशाली गोरे, माया पवार, सुजता मलगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस कुंभार व घाटे यांनी महिलांविषयी तक्रारी असल्यास निर्धोकपणे सांगाव्यात, असे आवाहन केले. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनने सदर रॅलीसाठी सहकार्य केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभा डुंबरे,सायली वशिष्ठ, स्वाती पाटील, नंदिता परदेशी, कीर्ती पाटील, दिपाली थोरात, शारदा थोरात, राधा बनकर, सोनाली बनकर, राजश्री आंबेकर संगीता गायकवाड व इतर महिलांवर्गाचे साह्य लाभले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.