Talegaon Dabhade : तळेगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोहर दाभाडे तर, सचिवपदी अतुल पवार यांची हॅट्रीक

एमपीसी न्यूज – तळेगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक ‘पुढारी’चे पत्रकार मनोहर दाभाडे यांची तर, सचिवपदी साप्ताहिक ‘अंबर’चे अतुल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच इतर पदाधिकारी देखील बिनविरोध निवडले गेले आहेत. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष सुनील वाळूंज यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत इतर पदाधिकारी निवडण्यात आले. ते पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष – तात्यासाहेब धांडे (सकाळ), खजिनदार –बी.एम.भसे(सकाळ), प्रकल्प प्रमुख सुरेश साखवळकर (साप्ताहिक ‘अंबर’), सोनाबा गोपळे (केसरी), सल्लागार – सुनील वाळूंज या प्रमाणे निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झालेले दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती, गुणवंत कामगार (महाराष्ट्र शासन),  विशेष कार्यकारी दंडाधिकारी, बजाज ऑटो कामगार सोसायटीचे माजी सचिव तर सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदाची जबाबदारी यशस्वीपणे त्यांनी सांभाळली आहे. तर, सचिव अतुल पवार हे साप्ताहिक ‘अंबर’मध्ये सह-संपादक असून त्यांची तिस-यांदा संघाच्या सचिवपदी फेर निवड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.