Talegaon Dabhade : वक्तृत्व स्पर्धेत मानसी पवार, दिशा पाटील, सृष्टी मराठे प्रथम

'माजी आमदार कृष्णराव भेगडे वक्तृत्व महाकरंडक' स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक स्तरावर कांतीलाल शहा विद्यालयाची मानसी पवार, उच्च माध्यमिक स्तरावर आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची दिशा पाटील आणि वरिष्ठ स्तरावर हरकचंद रायचंद बाफना डी.एड. कॉलेजची सृष्टी मराठे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख बक्षीस व करंडक देऊन गौरविण्यात आले.

‘माजी आमदार कृष्णराव भेगडे वक्तृत्व महाकरंडक’ स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संजय साने यांच्या हस्ते करण्यात आले. तर पारितोषिक वितरण संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी संस्थेचे खजिनदार चंद्रकांत शेटे, चंद्रभान खळदे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. प्रदीप कदम, सत्यवान सहाने, विजय बोत्रे, ऍड. शुभम घाडगे, प्रा. स्वाती देसाई, प्रा. शीतल मोरे यांनी काम पाहिले.

रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की उत्तम वक्ते हे फक्त राज्यस्तरीय किंवा देशस्तरावर नावलौकिक मिळवत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते नाव कमावतात. यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी यांचा नामोल्लेख करत रामदास काकडे यांनी उपस्थित शिक्षक पालक यांना मार्गदर्शन केले.

हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य ए.आर. जाधव, प्रा. संजय भोसले, प्रा. आर.आर. डोके, प्रा. के.डी. जाधव, प्रा. यु.एस. खाडप, अजित जगताप, प्रा. स्मिता गायकवाड, प्रा. मंजुश्री कारंडे, प्रा. मेधा कुटे, प्रा. दीप्ती पेठे, प्रा. शिवाजी जगताप, रोहिदास नागलगावकर, अनुराधा पनदरे, नीता अहिरे, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रा. प्रदीप कदम, अॅड. शुभम घाडगे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. पी. भोसले व प्रा. आर. आर. डोके यांनी, तर आभार प्रा.भाग्यश्री नाटकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.