Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये रंगला कै. पद्माकर प्रधान स्मृती मराठी सुगम संगीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

एमपीसी न्यूज- कलापिनीच्या वतीने नुकत्याच कै पद्माकर प्रधान स्मृती मराठी सुगम संगीत स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा कलापिनीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत 225 जणांनी सहभाग नोंदवला.

पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब तळेगावच्या अध्यक्षा राजश्री शहा व लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष प्रशांत शहा होते. स्पर्धेची अंतिम फेरी वाद्यवृंदाच्या साथीने रिऍलिटी शोच्या स्वरूपात संपन्न झाली.

प्राथमिक फेरीचे परीक्षण सतीश वैद्य, वैजयंती बागुल, विलास रानडे, डॉ केदार वळसंगकर व अनिल तरळकर यांनी तर अंतिम फेरीचे परीक्षण डॉ गौरी दामले, पं. विनोदभूषण आल्पे व अमेय गुप्ते यांनी केले. प्रौढ, युवक आणि शालेय (८वी ते १०वी) विभागाची अंतिम फेरी होती. सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त युवक विभागात नियोजित गीतांबरोबरच बाबूजींचे गीत स्पर्धकांनी सादर करून बाबूजींना मानवंदना दिली.

शालेय गटाचे निवेदन केतकी काटदरे व शिवानी जंजिरे या कुमार भवनच्या मुलांनी केले व प्रौढ गटाचे सायली रौंधळ व आरती पोलावार तर युवक गटाचे विशाखा बेके व चैतन्य जोशी यांनी केले. अंजली सहस्रबुद्धे यांनी वितरण समारंभाचे सूत्रसंचालन केले. अशोक बकरे यांनी पारितोषिके जाहीर केली व आभार मानले. सुमेर नंदेश्वर यांचे ध्वनी नियोजन तर विनायक लिमये, प्रदीप जोशी, सचिन इंगळे, दीपक आपटे, मंगेश राजहंस, अजय शिंदे, प्रवीण ढवळे यांनी संगीत संयोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ आनंद वाडदेकर, विनायक भालेराव , मुकुंद इनामदार, प्रतीक मेहता, चेतन पंडित, आदित्य धामणकर, जयवंत पांढरे, रामचंद्र रानडे, बुरसे काका या सर्वानी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.