Talegaon Dabhade : सांडपाण्याच्या वाहिनीतील पाणी रस्त्यावर आल्याने मारुती मंदिर चौकात दुर्गंधी

 एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकाच्या वळणावर शनिवारी (दि. 13) सकाळी भूमिगत ( Talegaon Dabhade) सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून रस्त्यावर पसरले. पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम करताना सांडपाणी वाहिनीत पाणी जाऊन तुंबल्याने ही घटना घडली. त्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले आहे.

मारुती मंदिर चौकाच्या वळणावर शनिवारी (ता. 13 ) सकाळी भूमिगत सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून रस्त्यावर पसरले होते. गेल्या दहा दिवसांपासून येथील सांडपाणी वाहिनी तुंबून रस्त्यावर पाणी पसरत आहे. या ठिकाणी पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदाई करण्यात आली होती. खोदाई करताना भूमिगत सांडपाणी वाहिनीत माती जाऊन ती तुंबली आहे.नागरिक व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Pune : विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

येथून वाहने वेगात जाताना सांडपाणी वाहिनीचे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडाल्याने भांडणाचे प्रसंग उद्भवत आहेत.तर दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. सकाळीच हॉटेल,दुकाने यांच्या दरवाजात पाणी पोचल्याने नागरिक संतप्त झाले होते.नगरपरिषदेच्या आरोग्य विभागानेयेथील तुंबलेल्या सांडपाणी वाहिनीचे साफसफाई करावी,अशी मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत.

मुख्याधिकारी एन के पाटील म्हणाले की,गटारीचे काम चालू आहे.लोकांच्या आरोग्याला काही इजा पोहोचणार नाही. आपल्याच कुटुंबातील लोकं आहेत.त्यांची ( Talegaon Dabhade) आम्ही काळजी घेऊ.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.