Talegaon Dabhade : नागरिकांच्या आरोग्यासाठी युवा उद्योजक आदित्य टकले यांच्यामार्फत मास्क वाटप

एमपीसी न्यूज – मस्करणीस कॉलनी दोन येथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना आज ‘करोना’ संदर्भात जनजागृती करण्यात आली. नागरिकांना घरोघरी जाऊन चांगल्या प्रतीच्या मास्कचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी टकले कॉलनी येथे राहणारे युवा उद्योजक आदित्य टकले यांच्यामार्फत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सर्व ठिकाणची भयानक परिस्थिती पाहता सर्व नागरिकांनी स्वच्छता बाळगावी. स्वतःच्या आरोग्याबरोबर कुटुंबीयांचे ही आरोग्य जपावे या उद्देशाने या मास्कचे वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी वर्धमान रेसिडेन्सी,तसेच चौराई माता प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, म्हस्करनीस कॉलनी दोन येथील नागरिक उपस्थित होते त्याप्रसंगी नगरसेवक अरुण माने तसेच धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले व तेथील नागरिक सुरेश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी करोना संदर्भात सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे व सुरक्षित रहाण्याचे नियम अटी सांगण्यात आल्या तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांविषयी माहिती देण्यात यावी, असेही सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.