Talegaon Dabhade : मनसेच्या 9 फेब्रुवारी रोजीच्या विराट मोर्चात मावळमधील कार्यकर्ते सहभागी होणार

एमपीसी न्यूज – पाकिस्तानी आणि बांग्लादेशी लोकांच्या घुसखोरांविरोधात येत्या 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून गोरेगाव – ते आझाद मैदान असा विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खुद्द मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे करणार आहेत.

या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असता हा मोर्चा भव्य करण्यासाठी मनसे नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली असून मोर्चासाठी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे.

याच अनुषंगाने आज मोर्च्याच्या तयारी व मार्गदर्शनासाठी मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर, पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र गारूडकर, मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राहूल मांजरेकर यांच्या तळेगांव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयात बैठक पार पडली.

यावेळी मावळ मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.