Talegaon Dabhade : मावळ तालुका भाजपची नूतन जम्बो कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भारतीय जनता पक्षाची नूतन जम्बो कार्यकारिणी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी जाहीर केली. जम्बो कार्यकारिणीत  एक संघटनमंत्री, तीन सरचिटणीस, 11 उपाध्यक्ष, 13 चिटणीस यांचा समावेश आहे. तालुक्यातील विभागवार कार्यकर्त्यांचा यात समाविष्ट  करण्यात आल्याचे रवींद्र भेगडे यांनी सांगितले.

तळेगाव दाभाडे येथे झालेल्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष  गणेश भेगडे, बाळासाहेब नेवाळे,माजी तालुकाध्यक्ष  प्रशांत ढोरे, माजी सभापती एकनाथराव टिळे, ज्ञानेश्वर दळवी,राजाराम शिंदे,गुलाबराव म्हाळसकर,शांताराम कदम,शिवाजी टाकवे, पांडुरंग ठाकर, मिलिंद बोत्रे, अभिमन्यू शिंदे,  तालुका युवक अध्यक्ष संदीप काकडे यांच्या  हस्ते कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

संघटनमंत्री म्हणून सांगवडे येथील किरण राक्षे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून सुनील चव्हाण(इंदोरी), विश्वनाथ जाधव (महागाव), कृष्णा घिसरे(देवले) यांची नियुक्ती करण्यात आली असून खजिनदार पदाची जबाबदारी भूषण मुथा (वडगाव)यांच्याकडे सोपवली आहे.

आंदर मावळ अध्यक्ष म्हणून गणेश कल्हाटकर(कल्हाट),पश्चिम मावळ अध्यक्ष -धनंजय टिळे (शिवणे), नाणे मावळ अध्यक्ष – अमोल केदारी(वाकसई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी याप्रमाणे उपाध्यक्ष: गोविंद बोडके (गहुंजे), बाळासाहेब गाडे (सुदूंबरे),रमेश  गायकवाड( चांदखेड), निवृत्ती वाडेकर (वहानगाव), हिरामण  सोरटे(दारुंब्रे ), शशिकांत गाडे (कुसगाव),मच्छिंद्र केदारी (ताजे), संभाजी शिंदे (अहिरवडे),शत्रुघ्न धनवे (शिळिंब),मारुती काटकर (पारवडी),  नामदेव भसे(मंगरूळ), चिटणीस:दिलीप  शिंदे(ओव्हळे), नवनाथ कडू (बोरज), दत्ता कोंडभर(शिळाटणे), मारुती लोहकरे (दिवड), संतोष ठुले (मळवंडी), नितीन गाऊडसे(मोरवे), बाळासाहेब ठाकर( थोरण),रोहिदास धामणकर(उर्से), दिलीप  गावडे(साते), गोपाळराव  पिंगळे (डाहुली), रामदास लालगुडे (नवलाख उंबरे), अनंता घारे(येलघोल),मुरली कुटे(सोमवडी), पंचायत समिती गण अध्यक्ष: टाकवे गण – अमोल भोईरकर, वडेश्वर गण –  अरुण कुटे, महागावगण -नारायण बोडके, चांदखेड गण- सूर्यकांत सोरटे,इंदोरी गण -संजय पवार, सोमाटणे गण- गुलाबराव घारे, वडगाव गण – सागर आगळमे,कामशेत गण – वसंतराव काळे,कुसगाव गण-  शेखर  दळवी, वाकसई गण  – सचिन येवले.

जिल्हा परिषद गट अध्यक्ष :टाकवे वडेश्वर गट- रोहिदास असवले, इंदोरी सोमटणे गट- अविनाश गराडे, वडगाव खडकाळा गट -राजेंद्र सातकर, कुसगाव वरसोली गट-राजेंद्र शिंदे,महागाव चांदखेड गट-ज्ञानेश्वर किसन आडकर.कार्यकारिणी सदस्य:किसनराव गावडे(कोथुर्ने), रमेश ठाकर(इंदोरी), दत्तात्रय मोधळे (अनसुटे)अमोल धिडे (जांभुळ), अनिल दळवी (भाजे).

यावेळी बाळा भेगडे, गणेश भेगडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. स्वागत सुनील चव्हाण यांनी तर प्रस्तावित किरण राक्षे यांनी केले. बाळासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अभिमन्यू शिंदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.