Talegaon Dabhade : डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातर्फे मणक्याचे आजार निदान व उपचार शिबिर

एमपीसी न्यूज – माईर्स एमआयटी संचलित एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे तर्फे मणक्याचे आजार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवारी (दि. 28) आणि शुक्रवारी (दि. 1) सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधीत होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता व अस्थी रोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत कामत यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

स्पाईन कन्सल्टंट डॉ तुषार देवरे, स्पाईन सर्जन डॉ. अशोक व्हटकर, प्राध्यापक व स्पाईन सर्जन डॉ संतोष बोरकर, युनिट हेड व स्पाईन सर्जन डॉ स्वप्नील भिसे आदी तज्ज्ञांची टीम या शिबिरात तपासणी करणार आहे. बदलत्या जीवनशैली तसेच इतर वैद्यकीय कारणांमुळे अलीकडे मान, पाठ आणि कंबरदुखीचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. वेळीच निदान व उपचार करून योग्य नियंत्रण ठेवून या आजारांचे पुढील दुष्परिणाम टाळता येतात. मणक्याच्या विविध आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे येथे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे.

या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या मणक्याचे अतिविशेष अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. शिबिराद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना पुढील तपासण्या, उपचार व शस्त्रक्रिया यासाठी विशेष सवलत उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात उपचारासाठी व दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी राहण्याचा खर्च मोफत असेल. या सवलतीचा मावळ परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालय व रुग्णालय व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1