Talegaon Dabhade : मायमर मावळ जनआरोग्य शिबिराचा 170 ग्रामस्थांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज- गजानन भाऊ खरमारे युवा मंच ,घोणशेत, मावळ व माईर्स एम आय टी पुणे चे एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने घोणशेत येथे आयोजित आरोग्य शिबिराला मावळमधील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घोणशेत, कचरेवाडी वाउंड, लंकेवाडी, खरमारेवाडी, देशमुखवाडी भागातील एकूण 170 ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन मावळ पंचायत समितीचे गटनेते दत्तात्रय शेवाळे, सुरेश चोरगे व ग्रामस्थ यांचे हस्ते झाले. यावेळी ज्ञानेश्वर चोरघे, गबलू चोरघे, गजानन खरमारे, हरिभाऊ चोरघे व गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तसेच महाविद्यालयाचे डॉ दर्पण महेशगौरी डॉ विजय भवारी उपस्थित होते.

आरोग्य शिबिराचे संयोजन गणेश मित्र मंडळ, स्वराज ग्रुप, शिवस्वराज्य मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, शंभूराजे प्रतिष्ठाण, गुरुदत्त मित्र मंडळ यांनी केले. महाविद्यालयाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश लोहोट यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.