Talegaon Dabhade : आमदार शेळके यांनी मांडला विकासकामांच्या निधीचा लेखाजोखा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील विविध विकास (Talegaon Dabhade) कामांकरिता सन 2019 ते 2023 पर्यंत 1 हजार 432 कोटी 11 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगत कोणत्या कामासाठी किती निधी आणला याचा सविस्तर लेखाजोखा मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांनी मांडला. तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नसल्याचे सांगितले. रविवारी (दि.12) संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तळेगाव दाभाडे येथील आमदार शेळके यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस मावळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तालुक्याचे माजी सभापती विठ्ठल शिंदे,माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके,संघटक संजय बावीस्कर,तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकर उपस्थित होते.

यावेळी आमदार शेळके यांनी 2023-24 च्या अंदाजपत्रकात समाविष्ट केलेल्या निधींची माहिती दिली. तळेगाव नगरपरिषदेच्या रस्ते,भुयारी गटारे,डाॅ बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान,नगरपरिषद नवीन इमारत बांधकाम या सर्व बाबींकरिता 62 कोटी 62 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगितले तर लोणावळा नगरपरिषदेच्या विविध कामांना 92 कोटी 15 लाख रूपयांचा निधी, वडगाव नगरपंचायतीसाठी 81 कोटी 8लाख रूपये, देहू नगरपंचायतसाठी 32 कोटी 84 लाख रूपये तर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी 7 कोटी 90 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे.

तालुक्यातील विविध सार्वजनिक बांधकामांकरिता 256 कोटी 85 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. तर जिल्हा वार्षिक नियोजना करिता 78 कोटी 71 लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तालुक्यात चालू असलेल्या जनजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेस 191 कोटी 48 लक्ष रूपये तर तालुक्यातील विविध भागातील पाणीपरवठा योजनांसाठी 78 कोटी 57 लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांकरिता 61 कोटी 41 लक्ष निधी प्राप्त झालेला आहे. पवना नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व वहातुकीचे पूल बांधण्याकरिता 60 कोटी 61 लक्ष रूपये तर इंद्रायणी नदीवरील बंधारा दुरुस्ती व नवीन पुल बांधणे यासाठी 6 कोटी 63 लक्ष रूपये निधी मिळाला आहे. कान्हे आणि मळवली येथील रेल्वे उड्डाण पुल बांधण्यासाठी 114 कोटी रूपयांची तरतूद झालेली आहे तर तालुक्यातील (Talegaon Dabhade) मोठी विकास कामे चालू असलेल्या कामाकरिता 230 कोटी 24 लक्ष रूपये निधींची तरतुद करण्यात आलेली आहे.

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार शेळके यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप केलेले होते ते सर्व आरोप खोडून काढत आमदार शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर पलटवार करत त्यांची मंत्रालयात काय प्रतिमा आहे. याचा पोलखोल शेळके यांनी केला तर भाजपाची दिल्लीत, गल्लीत व राज्यात सत्ता असूनही विकास कामे करता आली नाही असा आरोप करत आपल्याला जनतेने का नाकारले याचे आत्मपरीक्षण करून सुनील शेळके यांचा राजकारणात का उदय झाला याचे सिंहावलोकन करावे.

राज्यात आणि दिल्लीत आपले सरकार आहे. त्या सरकारकडून मी सुचविलेली दहा विकास कामे मंजूर करून आणून दाखवा असे आव्हान शेळके यांनी भेगडे यांना पत्राद्वारे दिले आहे. तर आपले बिनबुडाचे आरोप येथून पुढे खपवून घेणार नाही येथून पुढे असे आरोप केल्यास जनतेच्या दरबारात या सर्व गोष्टींची पुराव्यासह माहिती देईल.

मला जनतेने विकासकामे करण्याकरिता निवडून दिलेले आहे त्यामुळे मी विकास कामे तालुक्यात अधिक कशी आणता येतील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. तुमच्या सारखे काम न करता नारळ फोडण्याचे काम मी करत नाही असा टोला यावेळी शेळके यांनी लगावला. मला नारळ फोड्या आमदार व्हायचे नाही म्हणून मी या गोष्टी न करता तसेच दशक्रिया विधी,लग्न समारंभ आदी कार्यक्रमाला जायचे टाळतो असेही आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.