Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्यामुळे मिळाला आधार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 64 जणांना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि निराधार व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा आधार मिळण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या (Talegaon Dabhade) संपर्क कार्यालयाकडून सुविधा सुरु केली आहे. आमदार शेळके यांच्या माध्यमातून नागरिकांच्या कागदपत्रांची शासकीय कार्यालयाकडे पूर्तता करून विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात असल्याने अनेकांना शेळके यांचा आधार मिळत असल्याच्या भावना जनसामान्य व्यक्त करीत आहेत.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना उद्योजक शंकरराव शेळके यांच्या हस्ते लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार सुनिल शंकरराव शेळके जनसंपर्क कार्यालय येथे वितरित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आंदर मावळ अध्यक्षा उमा शेळके,रामनाथ गरुड, सचिन वामन,नबीलाल अत्तार,नितीन पिंगळे,दिनेश दरेकर,अरविंद पाटील आदी उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार मावळ तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 64 लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र शनिवार (दि. 28) वाटप करण्यात आले. दिव्यांग,ज्येष्ठ निराधार अशा वंचित घटकांसाठी संजय गांधी निराधार सारख्या शासकीय योजना आधार ठरत आहेत.

Dehuroad News : श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाच्या कामाला गती

मात्र या योजनेच्या लाभासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिकांची दमछाक होते.ही गरज ओळखून सर्वसामान्यांसाठीच्या योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात मार्फत कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरून घेण्यात आले होते.व त्यातील गरजूंना प्रमाणपत्र मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

पात्र लाभार्थ्यांमध्ये श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या 21 व संजय गांधी निराधार योजनेच्या 43 लाभार्थ्यांचा समावेश आहे.अशा शासकीय योजनेच्या लाभांमुळे गरजू व्यक्तींना आधार मिळतो,असे मत उद्योजक शंकरराव शेळके यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.