रविवार, जानेवारी 29, 2023

Talegaon Dabhade : एल अँड टी कंपनीतील कामगारांना मनसेचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – एल अँड टी कंपनीतील 236 कामगार (Talegaon Dabhade) त्यांच्या मागण्यांसाठी ४३ दिवसापासून कामगार आयुक्तालय पुणे येथे आंदोलन करीत आहेत. आंदोलक कामगारांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य नेते गणेश आप्पा सातपुते यांनी भेट घेतली. तसेच, मनसे कामगारांच्या हितासाठी त्यांच्या बाजूने उभी असल्याचे आश्वासन सातपुते यांनी दिले.

नवलाख उंब्रे औद्योगिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या L&T-defence कंपनीच्या मुजोर तसेच मनमानी कारभाराच्या विरोधात मावळ तालुक्यातील 236 स्थानिक कंत्राटी भूमिपुत्र कामगार गेल्या 43 दिवसापासून आपल्या न्याय हक्क व कामगारांच्या विविध मागण्यासाठी कामगार आयुक्तालय पुणे येथे ठिय्या आंदोलनाद्वारे आपला न्यायालयीन लढा लढत आहेत.

काल याच लढ्याला बळकटी व प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Talegaon Dabhade) महाराष्ट्र राज्य नेते गणेश आप्पा सातपुते (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश), हेमंत संभूस (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश), सचिन चिखले (नगरसेवक, अध्यक्ष-पिंपरी चिंचवड) रुपेश म्हाळसकर (अध्यक्ष मनसे मावळ तालुका), सचिन भांडवलकर (उपाध्यक्ष रस्ते व सुविधा), मावळ तालुका कोर कमेटी सदस्य सुरेश जाधव, संजय शिंदे, तानाजी तोडकर, पांडुरंग असवले, अंनता तिकोने, संग्राम भानुसघरे, राजेश भानुसघरे, किरण गवळी, भानुदास शिवणेकर तसेच युनियन अध्यक्ष महेंद्र शिंदे,गौरव गरुड, संदीप गायकवाड आदीजण मोठया संख्येने उपस्थित होते.

Today’s Horoscope 02 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Latest news
Related news