Talegaon Dabhade: शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मोनिका बेंजामिन

Talegaon Dabhade: Monica Benjamin as Vice President of City Women's Nationalist Congress मान्यवरांच्या हस्ते बेंजामिन यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

एमपीसी न्यूज- मोनिका महेश बेंजामिन यांची तळेगाव दाभाडे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता काळोखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पदग्रहण समारंभ पार पडला. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते बेंजामिन यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी महिला तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत, शहर अध्यक्ष गणेश काकडे, युवक अध्यक्ष आशिष खांडगे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, मंगल मु-हे, रुपाली दाभाडे, अदिती सोरटे, निशा पवार, उपाध्यक्षा ज्योती शिंदे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.