Talegaon Dabhade: मुलीला का नांदवत नाही म्हणून सासूची जावयाला मारहाण

Talegaon Dabhade: mother-in-law beaten to son in law, complaint lodged फिर्यादी राहुल आणि पत्नी सीमा यांच्यात भांडण झाले. या भांडणाच्या कारणावरून तिची आई आणि बहीण यांनी तिच्या घरी येवून फिर्यादी राहुल यांना लोखंडी गज व लाथाबुक्यांनी गंभीर मारहाण केली.

एमपीसी न्यूज- माझ्या मुलीला का नांदवत नाही म्हणून सासूने आपल्या दोन मुलींच्या मदतीने जावयाला लोखंडी गज व लाथ्याबुक्यांनी मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.18) रात्री आठच्या सुमारास जावयाच्या घरी तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी राहुल राजेंद्र मांजरेकर (वय. 30, राव कॅालनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी सीमा राहुल मांजरेकर, कमल गजानन खांडेभराड, कविता अनिल सातकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल आणि पत्नी सीमा यांच्यात भांडण झाले. या भांडणाच्या कारणावरून तिची आई आणि बहीण यांनी तिच्या घरी येवून फिर्यादी राहुल यांना लोखंडी गज व लाथाबुक्यांनी गंभीर मारहाण केली. तू माझ्या मुलीला नांदवत नाही काय, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.